No Mega Block On Nov 3: भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉक मधून प्रवाशांची सुटका; तिन्ही मार्गावर सेवा सुरळीत
पण सण लक्षात घेता अनेकजण प्रवास करत असतात त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रविवार 3 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवा सुरळीत धावणार आहेत. प्रामुख्याने रविवारचा मेगा ब्लॉक हा रेल्वे रूळाच्या देखाभालीसाठी, सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी घेतला जातो. या ब्लॉक दरम्यान देखभाल आणि दुरूस्तीची कामं केली जातात. पण सण लक्षात घेता अनेकजण प्रवास करत असतात त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रविवारी रेल्वे सेवा सुरळीत असल्याने प्रवाशांना विनासायास प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वे प्रामाणेच ट्रान्स हार्बर, उरण रेल्वे लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर देखील कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन उद्या सर्वत्र उपलब्ध असणार आहे.
मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक नाही
दिवाळी सणाची सांगता भाऊबीज हा सण साजरा करून होणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने आणि बहीण-भावाच्या नात्याचा सण साजरा करण्यासाठी एकमेकांकडे येण-जाणं होतं. मुंबईत रेल्वेचा प्रवास हा वेगवान असतो त्यामुळे अनेकांची पसंत मुंबई लोकलकडे असते.