दिवाळी सणामुळे मेगाब्लॉकच्या तावडीतून मुंबईकरांची सुटका; हार्बर प्रवाशांना मात्र दिलासा नाही

दिवाळीच्या सणाला काही तासांचाच आवधी राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रवासाची गरज ध्यानात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजचा (रविवार) मेगाब्लॉक रद्द केल आहे. पण, हार्बर प्रवाशांना मात्र हा आनंद मिळू शकला नाही.

मुंबईकर, दिवाळी आणि मेगाब्लॉक (संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

रविवारच्या दिवशी मेगाब्लॉक नाही,असा आश्चर्याचा धक्का मिळणे तसे मुंबईकरांसाठी काहीसे दुर्मिळच. पण, हा धक्का मुंबईकरांना आज मिळाला आहे खरं. दिवाळीच्या सणाला काही तासांचाच आवधी राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रवासाची गरज ध्यानात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजचा (रविवार) मेगाब्लॉक रद्द केल आहे. पण, हार्बर प्रवाशांना मात्र हा आनंद मिळू शकला नाही. करण, हार्बर मर्गावर आज सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

कसा असेल हार्बर मर्गावरील मेगाब्लॉत

(हेही वाचा, रेल्वे प्रवासात 'अॅप'च्या माध्यमातूनही करता येणार 'FIR')

मेल, एक्स्प्रेसही अर्धा ते सव्वा तास उशीराने धावणार