No Dresscode at Tuljapur Temple: तुळजापूर मंदिरामध्ये भाविकांसाठी जारी ड्रेसकोडचे निर्बंध मागे

स्त्री- पुरूष सह लहान मुलांना देखील ड्रेसकोडच्या नियमावलीनुसार, मंदिरात जाण्यापासून रोखले होते.

Tuljapur Wikicomins

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी (Tuljapur Temple) मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं (Dresscode) बंधन घालण्यात आलं होतं. पण हा निर्णय भाविकांना विश्वासात न घेता आणि अचानक लादल्याने काही मागील काही तास मंदिरात गदारोळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता हे निर्बंध मागे घेतले असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावर भाविकांना हाफ पॅन्ट, बर्मुडा किंवा उत्तेजक कपडे घातल्यास प्रवेश दिला जात नव्हता. काही भाविकांना मंदिराच्या प्रवेश द्वारावरील सुरक्षा रक्षकांनी हटकले होते. पण आता हा नियम मागे घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

स्त्री- पुरूष सह लहान मुलांना देखील ड्रेसकोडच्या नियमावलीनुसार, मंदिरात जाण्यापासून रोखले होते. यावरून गदारोळ झाल्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नोटीस जारी करत तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: Dress Code For Devotees in Tuljabhavani Temple: बर्मुडा, वनपीस, पॅन्ट शर्टधारींना नो एन्ट्री; तुळजा भवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड .

तुळजापूरच्या मंदिरामध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनाला येतात. हे देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. देवीचा जागर करण्यासाठी इथे भाविक येतात. सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहे. पण अचानक नियमावली जारी केल्याने काहींना दर्शनापासून दूर ठेवल्याने त्यांनी नाराजीचा सूर बोलून दाखवला आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Share Now
Advertisement