Development of Maharashtra: महाराष्ट्राच्या विकासात शिवसैनिकांचा अडथळा? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत एक तपशीलवार पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना लिहीले आहे.

CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील रस्ते विकास प्रकल्पांमध्येअडथळे आणतात, अशी तक्रार केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत एक तपशीलवार पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना लिहीले आहे. या पत्रात उदाहरणासह अनेक घटनांचा उल्लेख आहे. या पत्रात म्हटले आहे की, शिवेना पदाधिकारी अनेकदा ज्या मागण्या करतात त्या अतिशय नियमबाह्य असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्तेविकास प्रकल्प रखडण्याचा तसेच त्याची किंमतही वाढण्याची शक्यता असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांच्या पत्रास्त्रामुळे राज्याच्या राजकारणात वेगळी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांध्ये तीन ठिकाणी नियमबाह्य कामाचा आग्रह धरला जात आहे. त्यासाठी प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांना त्रास दिला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रकल्पाचे काम काही ठिकाणी थांबले असल्याचा संतापही गडकरी यांनी पत्रात व्यक्त केला आहे. ही परिस्थीती अशीच कायम राहिली तर कामे पुढे ठेवावीत का? याबाबत आपला विभाग विचार करत आहे, अशी निर्वाणीची भूमिका नितीन गडकरी यांनी पत्रात व्यक्त केले आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्यात भेट; जाणून घ्या काय आहे कारण)

नितीन गडकरी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, रस्त्यांची कामे जर अपूर्ण राहिली तर त्यामुळे वाहतूकीसाठी धोका निर्माण होईल. त्यातून अपघातांचे प्रमाण वाढेल. कामात अडथळा येण्याबाबत अशीच परिस्थीती जर कायम राहिली तर पुढे महाराष्ट्रातील कामे मंजूर करण्याबाबत विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.