केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बुलेट प्रूफला रामराम; नागपुरात आता इलेक्ट्रिक कार वापरायला सुरूवात
भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, अशी आशा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली आहे.
भारतामध्ये वाढते इंधनाचे दर हा चिंतेचा विषय असताना प्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक विकासासाठी रेटा वाढत आहे. यामध्ये आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात (Nagpur) फिरताना सरकारने दिलेल्या बुलेटप्रुफ गाडीला रामराम ठोकला आहे. आता नितीन गडकरी यांनी कालपासून इलेक्ट्रिक कार (Electric Car) वापरण्यास सुरूवात केली आहे तसेच लोकांनाही हळूहळू इलेक्ट्रिक कार वापरण्याचं आवाहन केले आहे. यावेळेस त्यांनी भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, अशी आशा देखील बोलून दाखवली आहे. नक्की वाचा: Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज.
लिथियम आयर्न बॅटरी असलेली इलेक्ट्रिक कार महागडी आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून अॅल्यूमिनियम किंवा स्टिल आयर्न वापरता येईल का याविषयी विचार सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. लवकरच ते याविषयी तज्ञांसोबत वोलून आढावा घेणार आहेत. देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढला की इंधनामुळे 8 लाख कोटींची आयात संपेल आणि आपण हळूहळू प्रदुषण मुक्त शहरांकडे प्रवास करू शकू असे देखील ते म्हणाले आहेत.
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याच्या अनुषंगाने नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचललं असल्याची माहिती दिली आहे. Budget 2021: वाहनांच्या Scrap Policy बद्दल अर्थसंकल्पात घोषणा, 20 वर्ष जुन्या खासगी गाड्या हटवल्या जाणार.
भारतामध्ये अनेक मेट्रो सिटीजमध्ये सध्या पेट्रोल-डीझेलचे दर हे प्रतिलीटर 100 रूपयांच्या जवळ पोहचले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. याचा परिणाम म्हणून महागाई वाढू शकते असा काहींचा अंदाज आहे. महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनं सुरु आहेत.