Burqa Ban In Maharashtra Board Exams? : बुरखा घालून 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थींना परवानगी नको; नितेश राणे यांचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र
महाराष्ट्रात 12वी ची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च असणार आहे. राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exams) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात परीक्षेदरम्यान चिटिंगचे प्रकार रोखण्यासाठी विद्यार्थींना बुरखा घालून येण्यास मज्जाव करावा या मागणीसाठी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पत्र लिहले आहे.
नितेश राणे यांनी लिहलेल्या पत्रामध्ये 10वी, 12वी बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्यावर मुलांचं करियर अवलंबून असतं त्यामुळे परीक्षा पारदर्शक होणं आवश्यक आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात म्हणून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये परीक्षार्थ्यांना बुरखा घालून येण्यास मज्जाव करावा कारण जर एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत असल्यास ते तपासणं शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल. असं नितेश राणे यांनी दादा भुसेंना पत्रात म्हटलं आहे. नक्की वाचा: Maharashtra HSC and SSC Timetable Download: महाराष्ट्र बोर्डाचे 10वी, 12वीचे सविस्तर वेळापत्रक पहा आणि इथे डाऊनलोड करा PDF स्वरूपात.
पहा नितेश राणेंची मागणी काय?
जे नियम हिंदू विद्यार्थ्यांना लागू आहेत, तेच नियम मुस्लिम विद्यार्थ्यांनाही लागू झाले पाहिजेत. ज्यांना बुरखा किंवा हिजाब घालायचा आहे ते घरी पण परीक्षेच्या वेळी घालू शकतात. केंद्रे, त्यांनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षा लिहिल्या पाहिजेत अशा घटनांमध्ये फसवणूक आणि कॉपी केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत, म्हणून मी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहिले आहे असे नितेश राणेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात 12वी ची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च असणार आहे. राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.