गिरगाव चौपाटीतील दर्शक गॅलरीवरुन आमदार Nitesh Rane यांचा पर्यावरणमंत्री Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा; BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून कारवाईची मागणी

मुंबईच्या सागरी भागाचा आनंद लुटण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची, नागरिकांची इथे मोठी गर्दी असते.

नितेश राणे ( Photo Credits: Wiki Common)

ठाकरे विरूद्ध राणे हा राजकारणातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. मागील काही महिन्यांपासून नारायण राणे आणि कुटुंब विरूद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंब असे अनेक संघर्षाचे प्रसंग पहायला मिळाले. आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर अजून एक निशाणा साधला आहे. राणेंनी ट्वीटरवर एक व्हिडीओ जारी करत 'सर्व CRZ चे नियम धाब्यावर बसवत,अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी बीएमसी गिरगाव चौपाटीवर व्ह्युविंग गॅलरी उभी करतेय. यावर आयुक्तांनी MRTP ACT नुसार कारवाई करावी अन्यथा या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईसंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल.' असं म्हटलं आहे.

नितेश राणेंच्या आरोपानुसार, गिरगाव चौपाटीवरील व्ह्युविंग गॅलरी ही पर्जन्यजलवाहिनीवर उभारण्यात आली असून समुद्रात पिलरही टाकण्यात आले आहेत, यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी बीएमसी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र देखील लिहले आहे. Mumbai: दादर येथील Chaitya Bhoomi Viewing Deck चे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन (Watch Video) .

गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेकडून नवी प्रेक्षक गॅलरी उभारण्याचं काम सुरू आहे. गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कवीवर्य भा. रा. तांबे चौकाजवळ पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीवर सुमारे 475 चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मुंबई दादर शिवाजी पार्क, गिरगाव मध्ये पालिकेने अशाप्रकारे व्ह्यविंग डेक बनवले आहेत. मुंबईच्या सागरी भागाचा आनंद लुटण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची, नागरिकांची इथे मोठी गर्दी असते.