Thane: कल्याणमध्ये नऊ वर्षाच्या मुलीची गळा चिरून हत्या, खुनाच्या आरोपाखाली 15 वर्षाच्या किशोरवयीन मुलाला घेतले ताब्यात, बलात्कार केल्याचाही संशय
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण भागात गुरुवारी सकाळी नऊ वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला, त्यानंतर एका किशोरवयीन मुलाला तिच्या हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले, जाणून घ्या सविस्तर
Thane, December 1: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण भागात गुरुवारी सकाळी नऊ वर्षांच्या मुलीचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला, त्यानंतर एका किशोरवयीन मुलाला तिच्या हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मुलीचा हा मृतदेह कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका गृहनिर्माण संकुलाच्या आवारात आढळून आला, परंतु ती तेथील रहिवासी नाही, असे महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. "सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना घटनेबद्दल माहिती दिली आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आम्ही भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार खून आणि इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे," असे पोलिसांनी सांगितले आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, आम्ही एका 15 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले, मुलीच्या वडिलांनी मुलाला शिवीगाळ केल्यानंतर मुलाने मुलीची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित आणि आरोपी एकत्र दिसत असून गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास हा गुन्हा घडला असावा, असे त्यांनी सांगितले. खून करण्यापूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे, असेही ते म्हणाले.