Night Curfew in Beed: बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, काय असतील महत्त्वाचे नियम?
यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच सेवा, व्यवहार बंद राहणार आहेत.
बीड (Beed) मध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यात नाईट कर्फ्यूची (Night Curfew) घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आतापासून बीड जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी देखील या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना वाढता प्रार्दुभाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सात ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असणार आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच सेवा, व्यवहार बंद राहणार आहेत.हेदेखील वाचा- Lockdown in Thane: ठाणे शहरातील 11 हॉटस्पॉट ठिकाणामध्ये आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
बीड जिल्ह्यात काय सुरु, काय बंद राहणार?
1) जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने , दूध विक्रेते दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.
2) जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर 18 मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद
3)जिल्ह्यातील फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी मास्क लावून फळविक्री करावी. जो नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
4) सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक
5)बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहतील. हॉटेलमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं.
धुळे जिल्ह्यातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. मीरा - भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ते 31 मार्च मध्यरात्री 12 पर्यंत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे.