Nigerian Woman Arrested at Mumbai Airport: नायजेरियन महिलेला मुंबई विमानतळावर 2 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह अटक

कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने एका महत्त्वपूर्ण कामगिरी करत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एका 42 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली आहे.

Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने एका महत्त्वपूर्ण कामगिरी करत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एका 42 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक केली आहे. या महिलेवर अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. तिच्याकडून अंदाजे 350 ग्रॅम वजनाच्या हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. हेरॉईन ड्रग्जच्या 20 कॅप्सूलची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिला अटक झाली. व्हिक्टोरिया ओकाफोर (Victoria Okafor) असे या महिलेचे नाव असून ती मुंबईहून दिल्लीला निघाली होती. AIU ने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, तिला ड्रग्ज वितरीत करण्यासाठी 50,000 रुपये मिळणार होते. या ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य अंदाजे 2 कोटी रुपये आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून AIU ला माहिती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने शुक्रवारी रात्री उशिरा AIU ला माहिती दिली. या माहितीमध्ये व्हिक्टोरिया ओकाफोर ही ड्रग्ज तस्करी करत असल्याबद्दल कळवले आणि अधिकाऱ्यांना सखोल तपास करण्यास सांगितले. तपासणीदरम्यान, अधिकार्‍यांना तिच्या ब्रेझियरमध्ये लपवून ठेवलेले दोन पाउच सापडले, ज्यात एकूण 20 कॅप्सूल होते. कसून केलेल्या तपासणीमध्ये असे, दिसून आले की कॅप्सूलमध्ये 350 ग्रॅम कोकेन आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2 कोटी रुपये आहे. (हेही वाचा, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी 13 पाकिस्तानी नागरिकांवर NIA कडून आरोपपत्र दाखल)

नालासोपारा येथील व्यक्ती सूत्रधार?

ओकाफोर हिने AIU कडे दिलेल्या निवेदनात खुलासा केला की, नालासोपारा येथील ओन्ये नावाच्या व्यक्तीने तिला हे पाउच दिले होते. दिल्लीला माल पोहोचवण्यासाठी तिला 50,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तिने दिल्लीतील इच्छित प्राप्तकर्त्याची ओळख उघड केली नाही. AIU अधिकारी या प्रकरणातील धागेदोरे तपासण्यासाठी नालासोपारा येथील कथीत ओन्ये नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणा मोठे रॅकेट आहे काय, याचाही शोध घेतला जात आहे. (हेही वाचा, Mumbai News: मालाडमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या, 20 लाख रुपयांचे एमडी जप्त)

आरोपीकडे नायजेरियन पासपोर्ट, दिल्लीमध्ये कपड्यांचा व्यवसाय

व्हिक्टोरिया ओकाफोर हिला न्यायालयात शनिवारी (9 नोव्हेंबर) हजर करण्यात आले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. धक्कादायक असे की, तिच्याकडे नायजेरियन पासपोर्ट आहे. ती दिल्लीत कपड्यांचा व्यवसाय करते. या अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना पकडण्यासाठी AIU सतत प्रयत्न करत आहे.

एक्स पोस्ट

पाठिमागील काही काळापासून देशभरात ड्रग्ज तस्करांचे मोठेच जाळे निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अंमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. यामध्ये अनेक मोठी रॅकेट असून त्यांचा वेळोवेळी पर्दाफाशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. खास करुन तरुणाई ड्रग्जच्या आहारी जात असल्याचे वास्तव असून ते चिंताजनक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.