Malegaon Bomb Blast Case : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूरनंतर सुधाकर द्विवेदीविरोधात वॉरंट जारी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीच्यावेळी सातत्यानं गैरहजर राहिल्यानं सुधाकर द्विवेदी याला न्यायालयाने जोरदार धक्का दिली आहे. विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत द्विवेदीविरोधात वॉरंट जारी केले आहे.
Malegaon Bomb Blast Case : मालेगाव 2008 बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast Case) प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाने (NIA Court) सुधाकर द्विवेदी (Sudhakar Dwivedi) याच्या विरोधात 10 हजार रुपयांचे वॉरंट जारी केले आहे. कोर्टानं नुकतंच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. आता, जर पुन्हा पुढील सुनावणीला हे गैरहजर राहील्यास सुधाकर द्विवेदीला अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.(हेही वाचा: Pragya Singh Thakur: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ, मालेगाव बॉम्बस्फोट केसमध्ये निघालं वॉरंट)
विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी द्विवेदी याच्या गैरहजेरीची गंभीर दखल घेतली आहे. सुधाकर द्विवेदी विरोधात 10 हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. तरीही, प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिल्या नाही. त्याऐवजी त्यांच्या वकिलांनी हजेरी लावली. प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी वकिलांनी केली होती. विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.(हेही वाचा:Malegaon Blast Case: कर्नल प्रसाद पुरोहित याची याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळी)
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना जीव गमवावा लागला होता. यात अनेक जण जखमी देखील झाले होते. त्यानंतर या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 06:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

