NHM Ratnagiri Recruitment 2021: आयुष मेडिकल ऑफिसर ते स्टाफ नर्स राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत रत्नागिरी मध्ये 166 पदांवर होणार नोकरभरती; असा करा अर्ज

166 जागांसाठी एनेस्थिसियोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन,मेडिकल ऑफिसर अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत सरकारी नोकरीची संधी शोधणार्‍यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे.  राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन रत्नागिरी (NHM Ratnagiri) मध्ये 166 पदांवर भरती साठी नुकतेच नोटिफिकेशन देण्यात आले आहे. सध्या येथे पदभरतीसाठी अर्ज भरण्याचं, स्वीकरण्याचं काम सुरू झालं आहे. इच्छुक उमेदवार रत्नागिरी प्रशासनाच्या ऑफिशिएल वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशन फॉर्म च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मे 2021 आहे.

दरम्यान कालच  राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  आरोग्य विभागात  16 हजार पदांची भरती  प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती दिली आहे. या भरतीत प्रामुख्याने 'क' आणि 'ड' प्रवर्गातील पदांचा समावेश असणार आहे. 'ब' वर्गातील पदेही भरली जाणार आहेत. 'क' आणि 'ड' वर्गातील सुमारे 12,000 तर 'ब' वर्गातील 2000 आणि 2000 विशेषज्ञ अशी मिळून 16 हजार पदं भरली जातील अशी माहिती आहे. Maharashtra Health Department Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात मेगाभरती, 16 हजार पदे भरली जाणार; पाहा सविस्तर.

कोणकोणत्या पदांवर होणार नोकर भरती?

फिजिशियन (6 पदे) – एमडी मेडिसीन

एनेस्थिसियोलॉजिस्ट (15 पदे) – एमडी, डीए आणि डीएनबी

माइक्रोबॉयोलॉजिस्ट (2 पदे) – माक्रोबॉयोलॉजी मध्ये एमडी

मेडिकल ऑफिसर (15 पदे) – एमबीबीएस डिग्री

आयुष मेडिकल ऑफिसर (12 पदे) – बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडएस

स्टाफ नर्स (100 पदे) – बीएससी नर्सिंग

लॅबोरेटरी टेक्निशियन (16 पदे) – बीएससी डीएमएलटी

NHM Ratnagiri Recruitment 2021 चे अधिकृत नोटिफिकेशन इथे पहा.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यसाठी इच्छुक उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाईट्ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर 'भरती' सेक्शन मध्ये ‘रिक्रूटमेंट फॉर कोविड-19’पर्यायात दिलेल्या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यामध्ये एक अर्जाचा नमूना दिला आहे. त्याला भरून सोबत कागदापत्र जोडून नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या ईमेल आयडी वर तो पाठवायचा आहे.



संबंधित बातम्या