Pune News: कोथरुड परिसरात रिक्षावर झाड कोसळलं, घटनेत चार जण गंभीर जखमी

पुण्यात एका रिक्षावर झाड कोसळले आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहे.

Tree collpased News

Pune News: पुण्यातील कोथरुड (Kotharud) परिसरात एक दुर्घटना घडली आहे. परिसरातील दशभुजा गणपती मंदिराजवळ जाणाऱ्या ऑटोरिक्षावर (Riksha) गुलमोहरचे झाड पडल्याची माहिती मिळाली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहे. सोबत रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 9:15 च्या सुमारास घडली. या घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

"दशभुजा गणपती मंदिराजवळ एकेरी मार्गावर मोठ्या गुलमोहरचे झाड ऑटोरिक्षावर कोसळले. ऑटोरिक्षा चालक आणि इतर तीन व्यक्ती वाहनात अडकले. अखेर त्यांना अग्निशमन दलाच्या पथकाने वाचवले," अधिकाऱ्यांनी अशी माहिती पोलिसांना दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर मोठी गर्दी केली.

स्थानिकांच्या मदतीने "चारही जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.अग्निशमन दलाचे कोथरूड केंद्रप्रमुख गजानन पाथरूडकर आणि राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी रिक्षावर पडलेले झाड बाजूला काढले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement