New Year 2021: नव वर्षाची पूर्वसंध्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची आज करडी नजर; नाईट कर्फ्यू ते फटाकेबंदी या नियमांचं भान ठेवत स्वागत करा नवावर्षाचं!

मुंबई पोलिसांची आज न्यू इयर सेलिब्रेशनवर करडी नजर असणार आहे.

Crackers (Photo Credits: Pixabay)

नववर्ष 2021 च्या स्वागतासाठी आता सारं जग सज्ज झालं त्याचं काऊंटडाऊनदेखील सुरू झालं आहे. पण सध्या कोविड 19 चं संकट दाट असताना महाराष्ट् सरकारकडून आज विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) आज न्यू इयर सेलिब्रेशनवर (New Year Celebration) करडी नजर असणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज रात्री 11 नंतर सारी पब, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स बंद केली जाणार आहेत. तर नाईट कर्फ्यू लागू असल्याने सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकं एकत्र जमू शकणार नाहीत. किंबहुना मुंबईत नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला कुठेच गर्दी होऊ नये म्हणून पालिका प्रशासन, मुंबई पोलिस चोख सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत. दरम्यान आज 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनबाबत नियमावली असली तरीही आनंदाने नव्या वर्षाचं घरच्या घरी स्वागत करण्यासाठी- ये-जा करण्यासाठी मुभा आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमक्या मुंबई पोलिसांच्या आजच्या सेलिब्रेशनवर किती आणिकोणती बंधनं असतील? New Year 2021 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages WhatsApp, Facebook द्वारा शेअर करून खास करा नववर्षाचा पहिला दिवस.

31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नेमक्या कोणत्या गोष्टींवर असतील बंधनं?

भारतासह देशभरात आज न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोना वायरसचं सावट पुन्हा गडद होण्याची चिन्हं असताना आरोग्याच्या दृष्टीने यंदा नियमावली कडक करण्यात आली आहे. नागरिकांनी त्याच पालन करण्याचं अवाहन देखील करण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif