New Suburban Time Table for Main Line: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे वर आजपासून नवं वेळापत्रक

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर आजपासून लागू होत असलेल्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंब्रा आणि कळवा स्थानकामध्येही दोन फास्ट लोकलला थांबा देण्यात आला आहे.

Photo Credit- X

मुंबई लोकलचं मध्य रेल्वेचं (Mumbai Local Central Line) वेळापत्रक आज 5 ऑक्टोबर पासून बदलण्यात आलं आहे. सीएसएमटी स्थानकावरील (CSMT Station)  भार कमी करण्यासाठी आता दादर स्थानकातून काही फास्ट लोकल (Fast Local)  चालवल्या जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. सीएसएमटीहून धावणाऱ्या 11 लोकल दादर स्थानकातून (Dadar Station) चालवण्यात येणार आहेत. तर, दादरपर्यंत धावणाऱ्या 24 लोकलचा विस्तार परळपर्यंत करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे ने आता नव्या वेळापत्रकामध्ये मुंब्रा आणि कळवा स्थानकामध्येही फास्ट लोकलला थांबा दिला आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. कळव्यामध्ये सकाळी 8.56 आणि मुंब्रा मध्ये 9.23 वाजता फास्ट लोकल थांबणार आहे तर संध्याकाळी कळवा मध्ये 7.29 आणि मुंब्रा मध्ये 7.47 वाजता फास्ट लोकल थांबणार आहे. त्यामुळे आता मुंब्रा आणि कळवा स्थानकातील प्रवाशांना दोन नव्या जलद लोकल मिळाल्या आहेत. Mumbai Metro Line 3: आज PM Narendra Modi करणार मुंबईमधील मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन; जाणून घ्या स्थानकांची नावे, तिकीट दर आणि वेळापत्रक.

 मध्य रेल्वे नवे वेळापत्रक

आता ठाण्यापलिकडेही लोकांचा प्रवास वाढला आहे. त्यामुळे ती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेवर गर्दी वाढत आहे. परिणामी मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याणपर्यंत अतिरिक्त 6 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, कर्जतला जाणारी शेवटची ट्रेन मध्यरात्री 12:12 वाजता, पूर्वीच्या 12:24 च्या सुटण्याच्या वेळेपेक्षा 12 मिनिटे आधी सुटणार आहे. त्याचप्रमाणे, कसाराला जाणारी शेवटची ट्रेन आता 12:08 वाजता, सध्याच्या 12:14 च्या वेळापत्रकापेक्षा सहा मिनिटे आधी सुटणार आहे त्यामुळे रात्री उशिरा काम करणार्‍यांना थोडं