Fake Caste Certificate Case: खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात नवे अजामीनपात्र वॉरंट जारी

यापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने राणा आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ज्याची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे.

Navneet Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

Fake Caste Certificate Case: मुंबईतील एका न्यायालयाने सोमवारी लोकसभा खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांच्या वडिलांविरोधात बनावट जात प्रमाणपत्र (Fake Caste Certificate) प्रकरणात नवे अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) जारी केले. यापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने राणा आणि त्याच्या वडिलांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, ज्याची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे. अमरावतीचे खासदार आणि त्यांच्या वडिलांविरोधात सुरू असलेल्या खटल्यात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी पोलिसांनी वॉरंटच्या अमंलबजावणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळून लावत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, महानगर दंडाधिकारी पीआय मोकाशी यांनी या दोघांविरुद्ध नवीन अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

त्यानंतर वॉरंटच्या सेवेचा अहवाल दाखल करण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. मुंबईच्या मुलुंड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवले होते. (हेही वाचा - Sudha Murthy Met Bhide Guruji: ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्तींनी घेतली भिडे गुरुजींचे भेट)

दरम्यान, नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या आहेत ती जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असल्याचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मध्ये अमरावतीच्या खासदाराला जारी केलेले जात प्रमाणपत्रही रद्द केले होते. कारण ते बनावट कागदपत्रे वापरून मिळवले होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा केल्याने खासदार नवनीत राणा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यानंतर नवनीत आणि तिच्या पतीलाही अटक करण्यात आली होती, त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती.