Lord Hanuman Birthplace Controversy: हनुमानाच्या जन्मस्थानावरून नवा वाद; प्रकरण मिटवण्यासाठी नाशिकमध्ये बोलावण्यात आली धर्मसंसद

वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देत त्यांनी हनुमानाचा जन्म नाशिकमधील अजनेरी येथे नसून कर्नाटकातील किष्किंधा येथे झाल्याचा दावा केला.

Lord Hanuman (Image used for Representational purpose only

Lord Hanuman Birthplace Controversy: भगवान राम आणि कृष्णाच्या जन्मस्थानावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत हिंदू संतांनी वेगवेगळे दावे मांडले आहेत. हनुमानाच्या जन्मस्थानावरून निर्माण झालेला नवा वाद मिटवण्यासाठी महंत श्री मंडलाचार्य पीठाधीश्‍वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी 31 मे रोजी नाशिक (Nasik) येथे धर्म संसद (Dharma Sansad) बोलावली आहे. या धर्मसंसदेत देशभरातील सर्व साधू-संत सहभागी होणार असून हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत आपले विचार मांडणार आहेत.

यानंतर धर्म संसद या विषयावर आपला निर्णय देईल. वास्तविक, कर्नाटकातील एक संत, महंत गोविंद दास यांनी दावा केला आहे की, भगवान हनुमानाचा जन्म नाशिकमधील अजनेरी येथे नसून किष्किंधा (कर्नाटक) येथे झाला होता. वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देत त्यांनी हनुमानाचा जन्म नाशिकमधील अजनेरी येथे नसून कर्नाटकातील किष्किंधा येथे झाल्याचा दावा केला. ते म्हणाले की, महर्षी वाल्मिकींनी रामायणात कुठेही हनुमानाचा जन्म अजनेरी येथे झाल्याचे लिहिलेले नाही. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी धर्मग्रंथांचा हवालाही दिला. (हेही वाचा - Asaduddin Owaisi On BJP: भाजप नेते ताजमहलाच्या खाली पंतप्रधान मोदींची पदवी शोधत आहेत; Taj Mahal उत्खननाच्या मागणीवर संतापले असदुद्दीन ओवेसी)

हनुमानजींचे जन्मस्थान अजनेरी असल्याचे त्यांनी सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी नाशिकच्या संतांना केले आहे. महंत गोविंद दास सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले, जिथे ते हनुमान जन्मस्थानी धर्मग्रंथांच्या आधारे नाशिकच्या संतांशी चर्चा करणार होते. या दाव्यावरून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी नाशिकच्या महंतांनी 31 मे रोजी धर्म संसदेची बैठक बोलावली आहे.

धर्म संसदेत घेतला जाणार निर्णय -

सध्या वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची केवळ सात प्रकरणे न्यायालयात पोहोचली आहेत. अशा परिस्थितीत महंत गोविंद दास यांनी हनुमानजींच्या जन्मस्थानाबाबत नवा वाद सुरू केला असला तरी यावेळी हा मुद्दा शास्त्रीय असल्याने त्याला धार्मिक रंग देण्यात आलेला नाही. असे असले तरी 31 मे रोजी होणाऱ्या धर्म संसदेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने आयोजकांना नोटिसा बजावल्या आहेत.