महाराष्ट्रात आजपासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा गजबजणार शाळा; नवं शैक्षणिक वर्ष ऑफलाईन सुरू
शाळा, आंगणवाड्यांमध्येही आज विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी फुलं, चॉकलेट्स देऊन स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर (Summer Break) आजपासून पुन्हा शाळा (Schools) पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. यंदा 13 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असलं तरीही प्रत्यक्ष शाळा 15 जून पासून सुरू होत आहेत. मागील अडीच वर्ष कोरोना संकटामुळे अनेक चिमुकल्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचं आव्हान स्वीकारावं लागलं. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा ऑफलाईन वर्ग सुरू होत आहेत.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्षात स्वागत केले आहे. त्यासाठीचा खास संदेश ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे मनोबल वाढवले आहे. दरम्यान कोरोना स्थिती आटोक्यात असली तरीही काही कोविड 19 प्रोटोकॉल पाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. Maharashtra Board SSC Result 2022 तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला!
शालेय मंत्र्यांच्या शुभेच्छा
शाळा, आंगणवाड्यांमध्येही आज विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी फुलं, चॉकलेट्स देऊन स्वागत केले जात आहे. सध्या मान्सून महाराष्ट्र व्यापत पुढे सरकत आहे. पण विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे अद्याप वातावरण उष्णच असल्याने त्या भागातील शाळा आजच्या ऐवजी 27 जून पासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.