Nepal Flight Missing: चार भारतीय आणि 22 प्रवाशांसह नेपाळचे विमान बेपत्ता, ट्रॅफीक कंट्रोलसोबत संपर्क तूटला-सूत्र
या विमानात चार भारतीयांसह 22 प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान नेपाळचे (Nepal) असून रविवारी (29 मे) सकाळपासून या विमानाचा कंट्रोल रुमसोबत असलेला संपर्क तुटला (Nepal Flight Missing). हे विमान पोखरा येथून नेपाळमधील जोमसोम येथे निघाले होते.
तारा एअर्स कंपनीचे 9 NAET ट्विन-इंजिन विमान (Tara Air's 9 NAET Twin-Engine Aircraf) बेपत्ता झाले आहे. या विमानात चार भारतीयांसह 22 प्रवाशांचा समावेश आहे. हे विमान नेपाळचे (Nepal) असून रविवारी (29 मे) सकाळपासून या विमानाचा कंट्रोल रुमसोबत असलेला संपर्क तुटला (Nepal Flight Missing). हे विमान पोखरा येथून नेपाळमधील जोमसोम येथे निघाले होते. दरम्यान, त्याचा संपर्क तुटल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअर्सचे ट्विन इंजिन हे विमान विमान पायलट कॅप्टन प्रभाकर घिमिरे यांच्या नेतृत्वाखाली हवेत उड्डाण भरत होते. या विमानाने सकाळी 9.55 वाजता पोखरा येथून हवेत उड्डाण केले.
मुस्तांग जिल्हा पोलिस कार्यालयाचे डीएसपी राम कुमार दाणी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही विमानाच्या शोधार्थ एक हेलिकॉप्टर तैनात केले आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच या विमानाबद्दल आम्हाला माहिती मिळेल. (हेही वाचा, Delhi: दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले, मोठी दुर्घटना टळली)
ट्विट
ट्विट
नेपाळच्या गृहमंत्रालयाने मुस्तांग आणि पोखरा येथून दोन खासगी हेलिकॉप्टर्स विमानाच्या शोधार्थ तैनात केली आहेत. याशिवाय नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात येत आहे, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फडिंद्र मणी पोखरेल यांनी ANI ला सांगितले.