राष्ट्रवादी युवा अध्यक्षाचा मुंबई महापालिका मुख्यालयात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
मुंबई महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर आज एका 30 वर्षीय तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या (BMC Headquaters) आयुक्त प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांच्या केबिन समोर आज एका 30 वर्षीय तरुणाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुदाम शिंदे (Sudam Shinde) असे या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा पर्यटन केला होता, ज्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुदाम हा मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथ राहत असून तो राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) शहर स्तरावरील युवा अध्यक्ष म्ह्णून काम करतो.
हे ही वाचा -Payal Tadvi Suicide Case: आरोपी सिनियर डॉक्टर्सना 21 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी
प्राथमिक माहितीत, घाटकोपर येथील एक शौचालय बिल्डरनं दुसऱ्या भागात हलवके. याच प्रकरणी वारंवार तक्रार करूनही कुणी दखल घेतली नाही. यामुळे संतापलेल्या सुदाम याने आपल्या तक्रारीकडं लक्ष वेधून घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.