राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनामध्ये रस नाही आम्ही 'विरोधी पक्षा'ची भूमिका निभावू: प्रफुल पटेल

'राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेमध्ये रस नाही आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावू' असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल्याने शिवसेना आणि भाजपा काय सत्ता स्थापनेसाठी काय राजकीय समीकरणं जुळवणार? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Praful Patel | Photo Credits: ANI Twitter

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचा निकाल महायुतीच्या बाजूने आहे. मात्र भाजपाने 'इस बार 220 की पार' चा नारा दिला होता मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे स्प्ष्ट बहुमत न मिळाल्याने आता सत्ता स्थापनेसाठी विविध पर्यायांचा विचार होऊ शकतो यामध्ये शिवसेना भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत येऊन सत्ता स्थापनेसाठी विचार करणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला आहे. ANI या वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी,'राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेमध्ये रस नाही आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावू' असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा काय सत्ता स्थापनेसाठी काय राजकीय समीकरणं जुळवणार? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशात महत्त्वाचा सहभाग असलेले दोन 'अमोल'

शिवसेना आणि भाजपा पक्षाने एकत्र मिळून विधानसभा निवडणूक लढली आहे. यामध्ये शिवसेनेला तर भाजपाला जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली. सत्ता स्थापनेसाठी 145 ची मॅजिक फिगर गाठायची आहे. मात्र महायुतीमध्ये शिवसेनेने 50-50 चा फॉम्युला राखत समसमान वाट्याची मागाणी रेटून धरल्यास काय होणार? हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे. आज मातोश्री बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ANI Tweet

विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेदरम्यान समसमान वाटपामध्ये मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच चुकीचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आज शरद पवार यांनी बारामतीमध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे.