Anushakti Nagar: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) तिसरी यादी जाहीर; अणुशक्ती नगर येथून Sana Malik विरोधात Swara Bhasker यांच्या पतीस उमेदवारी

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (27 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदत ही घोषणा केली. त्यांची लढत अजित पवार यांच्या पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांच्या विरोधात होईल.

Fahad Ahma | (File Image)

Maharashtra NCP SP Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSS) पक्षाने आपली उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये एकूण नऊ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षाने अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) यांचे पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (27 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदत ही घोषणा केली. त्यांची लढत अजित पवार यांच्या पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांच्या विरोधात होईल. आतापर्यंत समाजवादी पक्षात असलेल्या अहमद यांना NCP (SS) मध्ये प्रवेश देत शरद पवार यांनी केलेल्या खेळीने उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी उमेदवार यादी

  1. करंजा - ज्ञायक पटणी
  2. हिंगणघाट - अतुल वांदिले
  3. हिंगणा - रमेश बंग
  4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
  5. चिंचवड - राहुल कलाटे
  6. भोसरी - अजित गव्हाणे
  7. माझलगाव - मोहन बाजीराव जगताप
  8. परळी - राजेसाहेब देशमुख
  9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2024: Sana Malik-Sheikh अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून मैदानात; अजित पवार यांच्या NCP कडून उमेदवारी)

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी

  1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील
  2. गंगापूर -सतीश चव्हाण
  3. शहापूर -पांडुरंग बरोरा
  4. परांडा- राहुल मोटे
  5. बीड -संदीप क्षीरसागर
  6. आर्वी -मयुरा काळे
  7. बागलान -दीपिका चव्हाण
  8. येवला -माणिकराव शिंदे
  9. सिन्नर- उदय सांगळे
  10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
  11. नाशिक पूर्व- गणेश गीते
  12. उल्हासनगर- ओमी कलानी
  13. जुन्नर- सत्यशील शेरकर
  14. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
  15. खडकवासला -सचिन दोडके
  16. पर्वती -अश्विनीताई कदम
  17. अकोले- अमित भांगरे
  18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
  19. माळशिरस- उत्तमराव जानकर
  20. फलटण -दीपक चव्हाण
  21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर
  22. इचलकरंजी- मदन कारंडे (हेही वाचा,Sana Malik On Devendra Fadnavis: नवाब मलिकांची मुलगी सना मलिकची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाल्या तुम्ही दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकासोबत दिसला होतात )

दरम्यान, महाविकासाघाडीतील घटकपक्षांमध्ये सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. ज्या जागांवरील तिढा सुटला आहे, त्या ठिकाणच्या जागा शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस या तिनही पक्षांनी जाहीर केल्या आहेत. ज्या काही जागा अद्याप बाकी आहेत त्यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान, या पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांना किती जागा सोडल्या आहेत, याबाबत मात्र अद्याप माहिती पुढे येऊ शकली नाही. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्येही फार काही अलबेल आहे असे नाही, महायुतीतल घटक पक्षांनीही काही ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळू लागली आहे.