Anant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शिवसेना नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शिवसेना नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका करताना शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाटीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली असे विधान केले होते. या विधानावर खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडच्या काळात अनंत गीते यांची अवस्था राजकीयदृष्टया 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशा पध्दतीची झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्तेतून त्यांनी हे विधान केल्याचे तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील तटकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, अनंत गीते बोलल्याने काही फरक पडत नाही. परंतूत सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. आघाडीचे जनक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छपणाने राज्याचे काम करत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतोय याची प्रशंसा होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांना या सार्या कृतीचं भान राहिलेलं नाही, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले. (हेही वाचा, Anant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात)
राष्ट्रवादी पक्ष हा सिध्दांतावर, पवारसाहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष या राज्यात आहेच परंतु देशाच्या जडणघडणीत पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे अढळ स्थान कुणी बोलल्याने कमी होणार नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. अनंत गीते दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी आदरणीय पवारसाहेबांना अतिशय वाकून नम्रपणे पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले या घटनेचा मी साक्षीदार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2021 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

