सिंहगड कॅम्पस दुर्घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल

तर 9 जण जखमी झाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केला आहे.

Supriya Sule (Photo Credits: Facebook)

पुण्यातील आंबेगावात सिंहगड कॉलेज कॅम्पसची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. कोंढवा दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेने काही बोध घेतला नाही का? या सवाल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत विचारला आहे. (मुसळधार पावसामुळे पुणे, कल्याण, मालाड परिसरात भिंत कोसळली, दुर्घटनेत 22 जण ठार)

कोंढवा दुर्घटनेवरुन बोध का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करुन सिंहगड कॅम्पसमध्ये असाच प्रकार घडला असून काही मजूरांचा यात बळी गेला. कृपया, संरक्षक भिंती, घरे, निर्माणाधिन इमारतींची पाहणी करुन मजूरांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवा. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट सुप्रियाताईंनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट:

पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सिंहगड कॅम्पसमध्ये असाच प्रकार घडला. त्यामुळे सुप्रियाताईंनी ट्विटवरुन आपला संताप व्यक्त केला.