Jitendra Awhad Criticizes Opposition: महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे 'मराठी भैय्ये' आता माफी मागणार का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.
Sushant Singh Rajput Case: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या झाली आहे, असा अहवाल एम्सने दिला आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीदेखील विरोधकांना टोला लगावला आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. महत्वाचे म्हणजे, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट नेमके कोणासाठी आहे? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?’अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Hatras Gang Rape: आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही 'दिशा कायदा' संमत करावा; हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर मनसेची राज्य सरकारकडे विनंती
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट-
याप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडेणेकर यांनीदेखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र केले गेले. मात्र, आमचा यंत्रणांवर विश्वास आहे, या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घ्यावा, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.