Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण, जयंत पाटील, नवाब मलिक यांनी दिली माहिती
सहकार आणि सहकार क्षेत्रात निर्माण झालेले विविध प्रश्न आदी पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात भेट झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यात आज (17 जुलै) दिल्ली येथे भेट झाली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असतानाच प्रसारमाध्यमांतून उलटसुलट बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, ही भेट, भेटीतील तपशील आणि प्रसारमाध्यमांतून आलेल्या बातम्या या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकारपरिषदेत माहिती दिली. देशभरातील सहकारा क्षेत्राचे काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारने सहकारी बँकांसदर्भात कायद्यामध्ये काही बदल केले आहेत. त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, काही प्रसारमाध्यमं मात्र अत्यंत चुकीचे वृत्त देत आहेत. शरद पवार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते दिल्लीत भेटले असल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. परंतू, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने सहकारी बँकांचे अधिकार मर्यादीत करुन आरबीआयला अमर्याद अधिकार दिले आहेत. सहकारासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या कायद्यामुळे असे घडले आहे. सहकार हा राज्य सरकारचा विषय आहे. तो राज्य सरकारकडेच राहावा. त्यामुळे याबाबत शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनद्वारे या आधी चर्चा झाली होती. परंतू, आता प्रत्यक्ष भेटीद्वारे यावर चर्चा झाली. या वेळी पवाह यांनी पंतप्रधानांना एक पत्रकही दिले. (हेही वाचा, Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात)
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेत भाजप नेते म्हणून नियुक्त करणयात आले. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर पीयूष गोयल स्वात:हून शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवास्थानी गेले होते. उभय नेत्यांमध्ये झालेली ती एक सदिच्छा भेट होती. जो व्यक्ती सभागृहाचा नेता असतो तो व्यक्ती संसदेतील सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेतो ही परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच ही भेट झाली. यात वावगे से काहीच नाही, अशे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
एएनआय ट्विट
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मोदी-पवार यांच्या भेटीबाबत माहिती दिली. सहकार आणि सहकार क्षेत्रात निर्माण झालेले विविध प्रश्न आदी पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात भेट झाली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.