महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी राष्ट्रवादी कडून शिवसेनेला समर्थन मिळावे म्हणून नवा प्रस्ताव, केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद सोडण्याची गळ
तर एनसीपी आणि शिवसेना सत्ता स्थापनासाठी एकत्र येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर एनसीपी आणि शिवसेना सत्ता स्थापनासाठी एकत्र येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापनासाठी नवा प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार शिवसेनेने केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद सोडावे अशी गळ घातली आहे. तर केंद्राचे कॅबिनेट मंत्री पद अरविंद सावंत यांच्याकडे आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी असा दावा केला आहे की, विधानसभेत भाजपच्या उमेदवारांना हरवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करु शकते. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेची याबाबत कसून पारख करणार आहे. मिरर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीपी नेते यांनी असे म्हटले आहे की, शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन हवे आहे. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समर्थन मिळावी अशी अपेक्षा शिवसेनेकडून केली जात आहे.('आमची तयारी पूर्ण, भाजपशिवाय सरकार स्थापन करणार'; शिवसेना नेते संजय राऊत यांचा खळबळजनक दावा)
त्यामुळे जर शिवसेनेला राष्ट्रवादीचा हा प्रस्ताल मंजूर असल्यास त्यांना केंद्रीय मंत्री पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे खरच शिवसेना राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनसाठी तयार असल्याचे स्पष्ट होईल. नाहीतर हा सर्व दिखावा असून शेवटी भाजप-शिवसेना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करु शकतात. तर महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. त्यापैकी शिवसेनेला 56 जागा आणि भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेस पक्षाला 44 जागांवर विजय मिळवला आहे.