IPL Auction 2025 Live

भारताची कोसळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणखी एका मनमोहन सिंग यांची गरज; 'एक शरद सारे गारद' मध्ये पवारांची फटकेबाजी

यामध्ये शरद पवार यांनी भारतासमोरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांचा आढावा घेतला आहे

Sharad Pawar And Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

दैनिक सामना मध्ये आज (12जुलै) 'एक शरद सारे गारद' या एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरोथॉन मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये शरद पवार यांनी भारतासमोरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांचा आढावा घेतला आहे. यामध्ये कोरोना संकटकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा मजबूत करण्यासाठी अजून एका मनमोहन सिंग यांची गरज आहे, पण मोदी सरकारला तज्ञांचे सल्ले नकोत असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. सोबतच बारामतीमध्ये एका सभेत बोलताना नरेंद्र मोदींना शरद पवारांचा उल्लेख राजकीय गुरू म्हणून केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी राजकारणा कुणीही गुरू नसतो सारे सोय पाहतात असे स्पष्ट केले होते. शरद पवार महाआघाडी सरकारमध्ये हेडमास्तर की रिमोट कंट्रोल? पहा त्यांचं उत्तर.

दरम्यान आज प्रसारित झालेल्या दुसर्‍या भागात शरद पवार यांनी मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यांनी ज्यापद्धतीने देशाची अर्थव्यवस्था सावरली. त्याला नरसिंह राव यांची मिळालेली जोड याचा दाखला देत आता कोरोना संकटकाळामध्ये कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारणं हे मोठं आव्हान आहे. पूर्वी चिदंबरम, प्रणब मुखर्जी आणि मनमोहन सिंग देखील इतर पक्षांशी बोलून,तज्ञांशी बोलून निर्णय घेत असे. मात्र मोदी सरकारामध्ये मात्र त्याचा अभाव जाणवतो.

कोरोना संकटाप्रमाणेच शरद पवार यांनी भारत देश आणि सीमेवरील राष्ट्रांशी त्यांचे सध्या तणावग्रस्त झालेले संबंध यावरही आपली मतं व्यक्त केली आहेत. दरम्यान भरातीय मनात आपला शत्रू पाकिस्तान येतो. पण देशाला चीन पासून होणारा उपद्रव देखील साधासुधा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी आणि चीनी लष्करी शक्तीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

सीमावाद तसेच सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांवर यूएन सारख्या संस्थामधून, डिप्लोमॅटिक चॅनलमधून चर्चेमधून मार्ग काढणं हितावह आहे. यामध्ये राजकारण आणू नका असा सल्ला देखील शरद पवारांनी दिला आहे.