शरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख
शरद पवार यांच्या विकीपिडिया पेजवर मागील चोवीस तासामध्ये सलग तीन वेळेस बदल करण्यात आले आहेत.
शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रातील मातब्बर राजकारण्यांपैकी एक आहे. मात्र मागील चोवीस तासामध्ये त्यांच्या विकीपीडिया प्रोफाईलमध्ये सलग तीन वेळेस बदल करण्यात आल्याने सध्या ते चर्चेमध्ये आहे. विकीपिडिया (Wikipedia) पेजवर शरद पवारांच्या नावापुढे 'भ्रष्टाचारी नेता'(Corrupt) असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 'लॉयल' (Loyal) आणि आता शरद पवारांच्या नावापुढे 'लोकप्रिय' (Most Popular) नेता असे विशेषण वापरण्यात आलं आहे. विकीपिडीयाच्या पेजवर ही माहिती काही अज्ञातांकडून बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Sharad Pawar (Photo Credits: Wikipedia)
शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. यंदा खुद्द शरद पवार आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये रिंगणात उतरणार नसले तरीही त्यांची कन्या सुप्रिया सुळे (बारामती) आणि नातू पार्थ पवार (मावळ) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement