Lok Sabha Elections 2019: मतदार निर्णायक मतदान करतील: शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
मुंबईतील ताडदेव येथील मतदान केंद्रावर शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वयाच्या 79 व्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसवा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणूक 2019च्या (Lok Sabha Elections) मतदानाचा आज 4 था टप्पा आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 17 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले आहे. मतदान केल्यानंतर शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबईकर मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. मतदान कसे करावे #भारत: ‘वंचित ना राहो कुणी मतदार’ साठी निवडणूक आयोग सज्ज, पहा कोणत्या ओळखपत्रावर करू शकता लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान?
शरद पवारांचं ट्विट
मतदानाचा हक्क मुंबईतील ताडदेव येथील मतदान केंद्रावर बजावल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत लोक निर्णायक मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा आहे. स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. मुंबईकरही मतदानात मागे न राहता मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावतील असं त्यांनी म्हटलं होतं.
अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबीयातील काही सदस्यांनी बारामतीमध्ये काटेवाडी येथे 23 एप्रिलला मतदान केले आहे.