Nawab Malik Vs Sameer Wankhede: नवाब मलिकांना NCB Officer चं निनावी पत्र,खोट्या केस तयार केल्या जात असल्याचा दावा; समीर वानखेडे यांच्या चौकशीची मागणी

त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना एका एनसीबी अधिकार्‍याने पत्र पाठवलं आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात आज(26 ऑक्टोबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मालिक (Nawab Malik) यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. काल त्यांचं जातप्रमाणपत्र, पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटर वर शेअर करत खळबळ माजवली होती आणि आता एका एनसीबी ऑफिसरचं पत्र देखील ट्वीट केले आहे. नवाब मलिकांनी त्यांना मिळालेलं एक निनावी पत्र ट्वीट केले आहे. यामध्ये 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी असं म्हटलं आहे. नक्की वाचा: समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रतिक्रीया; पहा काय म्हणाले .

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंना पुन्हा लक्ष्य केले आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना एका एनसीबी अधिकार्‍याने पत्र पाठवलं आहे. त्याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, डीजी आणि कॉंग्रेस अध्यक्षांनाही पाठवले आहे. एनसीबी कार्यालयामध्ये एक ग्रुप आहे जो खोटी प्रकरणं तयार करत आहे. प्रामाणिक अधिकार्‍यांना डावललं जात आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी नवाब मलिक आग्रही आहेत.

नवाब मलिक यांचे ट्वीट

समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र देखील कालपासून चर्चेचा विषय आहे. ज्ञानेश्वर वानखेडे हे समीर वानखेडेंचे वडील जन्माने दलित आहेत. त्यांनी दलित असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं. सरकारी नोकरी घेतली त्यानंतर त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं आणि धर्मांतर केलं. त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले. समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन सर्टिफिकेट घेतलं, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.