Nawab Malik's son-in-law Sameer Khan Dies: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन

समीर खान यांच्या कारच्या चालकाने हे निलोफर आणि समीर गाडीत बसत असताना अचानक ब्रेक ऐवजी चुकून ऍक्सिलेटरवर पाय दिला आणि कार एका भिंतीला धडकली. या अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Nawab Malik's son-in-law Sameer Khan Dies: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन
Nawab Malik | X

नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचे निधन झाले आहे.  नवाब मलिकांनी सोशल मीडीया मध्ये पोस्ट करत याची माहिती दिली आहे.  जावयाच्या निधनामुळे मलिकांचे पुढील दोन दिवसाचे सारे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजी नगर भागातील एनसीपीचे उमेदवार आहेत. अजित पवारांनी त्यांना पक्षाकडून तिकीट दिले आहे.

समीर खान यांना कुर्ला परिसरामध्ये 17 सप्टेंबर दिवशी गाडीत बसताना अपघात झाला होता. त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. अपघातामध्ये शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आणि मेंदूमध्ये गुठळ्या झाल्या होत्या.  मात्र महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. समीर खान हे नवाब मलिक यांची लेक निलोफर यांचे पती आहेत.

समीर खान यांच्या कारच्या चालकाने हे निलोफर आणि समीर गाडीत बसत असताना अचानक ब्रेक ऐवजी चुकून ऍक्सिलेटरवर पाय दिला आणि  कार एका भिंतीला धडकली. या अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) नेण्यात आले होते.

विनोबा भावे नगर पोलिस स्टेशनमध्ये कारचालक अन्सारीविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवणे आणि निष्काळजीपणामुळे मानवी जीवन / सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्ये केल्याच्या ठपका ठेवत BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कार चालक पोलिसांच्या अटकेत आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2024 07:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).