ED ने अटक केलेल्यानंतर Nawab Malik यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत तात्काळ सुटका करण्याची मागणी

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मुलावर कारवाई केली आहे.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबत (Money Laundering Case) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्याविरुद्ध दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्या नवाब मलिक 3 मार्चपर्यंत ईडी (Enforcement Directorate) च्या कोठडीत आहेत. त्यांची अटक बेकायदेशीर असून त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, असे मलिक यांनी याचिकेत म्हटले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना 23 फेब्रुवारी रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली होती. मलिकला मनी लाँड्रिंग प्रकरणांशी निगडित विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले. (वाचा - Dawood Ibrahim money laundering case: Nawab Malik यांचा मुलगा Faraz Malik ला ईडी कडून समन्स जारी)

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने सोमवारी महाराष्ट्राचे मंत्री प्राजक्त तनपुरे आणि इतरांची सुमारे 94 एकर जमीन जप्त केली. तनपुरे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे चौथे नेते आहेत, ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासाची चाहूल लागली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नवाब मलिक यांच्यावर कथित मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन व्यवहारात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच अंडरवर्ल्डच्या विरोधात गुन्हा दाखल करून अनेक ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी काही आठवड्यांपूर्वी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही अटक करण्यात आली होती.

याशिवाय दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आता महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मुलावर कारवाई केली आहे. आज मंगळवारी एएनआयने वृत्त दिले की, ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फिरोज मलिक याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोटीस पाठवली आहे.