Nawab Malik Health Updates: नवाब मलिक कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल; प्रकृती अचानक बिघडल्याने तातडीने उपचार सुरु
शनिवारी (30 मार्च) सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आहे. त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होतो आहे याबाबत माहती मिळू शकली नाही.
Nawab Malik Latest Marathi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (30 मार्च) सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आहे. त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होतो आहे याबाबत माहती मिळू शकली नाही. रुग्णालय लवकरच त्यांना होणारा त्रास आणि उपचारांबाबत माहिती देणाल असल्याचे समजते. महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असतानाच त्यांना ईडीने अटक केली. प्रदीर्घ काळ तुरुंगात राहावे लागल्याने त्यांची प्रकृती कमालीची खालावली. त्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला.
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेते मानले जात. मुंबई एनसीबीने मलिक यांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई केली होती. त्याच काळात एनसीबीने मुंबई येथील एका क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खान याच्या मुलासह काही तरुणांना अटक केली. त्यांच्यावरही अंमली पदार्थांचे सेवन आणि ते सोबत बाळगल्याचा आरोप होता. या प्रकरणात नवाब मलिक यांनी जोरदार भूमिका घेतली होती. ज्यामुळे तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समिर वानखेडे अडचणीत आले. मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरुनही मोठी पोलखोल केली होती. दरम्यान, एका काही वर्षे जुन्या प्रकरणामध्ये ईडीने त्यांना अटक केली आणि त्यांचा आवाज बंद झाला.
नवाब मलिक यांना मुत्रपींड आणि इतरही शारीरिक त्रास आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असल्याचे त्यांच्या वकिलाने कोर्टात सांगितले. तसेच, त्यांना जामीन मंजूर करावा अशी विनंती केली. मलिक यांच्या जामिनास ईडीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच कोर्टात विरोधही केला. मात्र, कोर्टाने मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर केला. दरम्यान, जामीनाची मुदत संपत आल्याने पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज दाखल झाला. दरम्यान, मलिक यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आपणास देण्यात आली नाही. रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात यावी, असेही ईडीने कोर्टाला म्हटले आहे. दरम्यान, कोर्टानेही जे. जे. रुग्णालयाकडून नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत अहवाल मागितला आहे. (हेही वाचा, Ajit Pawar On Nawab Malik: नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी माझा मुद्दा मांडणार; देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया)
अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँर्डिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर काही काळानंतर त्यांना जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले.