Navratri 2021 Guidelines: यंदा नवरात्रीमध्ये गरबा व दांडियाचे आयोजन नाही, 4 फुटांची असेल मंडळातील देवीची मूर्ती; BMC ने जारी केल्या मार्गदर्शक सुचना

मात्र अजूनही देशावर कोरोनाचे सावट असल्याने आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी (30 सप्टेंबर, 2021) हा उत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत

Navratri 2021 (Photo Credits: Pixabay and Wikimedia Commons)

देशात गणपतीनंतर नवरात्रोत्सवाची (Navratri 2021) धूम सुरु आहे. मात्र अजूनही देशावर कोरोनाचे सावट असल्याने आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी (30 सप्टेंबर, 2021) हा उत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. कोविड-19 आणि डेंग्यूच्या प्रसाराच्या वाढत्या भीती दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. शासनाने ऑनलाईन दर्शनावर भर द्यावा असे सांगितले आहे. परंतु कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉल लक्षात घेऊन मंडळामध्ये देवीचे दर्शन दिले जाईल. नियमांचा भंग केल्यास अशा व्यक्तींविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मार्गदर्शक सुचना-