नवी मुंबई: विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तर अटक केलेला तरुण हा माजी विद्यार्थी असल्याची बाब समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

नवी मुंबई (Navi Mumbai)  मधील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तर अटक केलेला तरुण हा माजी विद्यार्थी असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाला न्यायालयाने पोलीस कोठडी येत्या 27 ऑगस्ट पर्यंत सुनावली आहे.

विनोद फज असे तरुणाचे नाव असून तो एमजीएम इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. विनोद याने महाविद्यालयातील झेरॉक्सवाल्याच्या दुकानाजवळ हस्तमैथून करण्याचा प्रयत्न सर्वांसमोर केला. या प्रकरणी त्याला महाविद्यालयातील तरुणांनी आणि पीडित तरुणीने मिळून चोप दिला. परंतु महाविद्यलयाच्या प्राचार्यांना या प्रकरणाकडे कानाडोळा केला. याबाबत अधिक वृत्त महाराष्ट्र टाइम्स यांनी दिले आहे.(नाशिक: खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाच्या गाडीला अपघात, कार चालवणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू)

पीडित तरुणी झेरॉक्स काढण्यासाठी उभी असता विनोद याने तिच्या पाठी उभे राहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करत घडलेला प्रकार दाखवून दिला. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी विनोद याला चोपले. परंतु रात्री उशिरा विनोद याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.