Navi Mumbai Shooting: नेरूळ मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू

बिल्डरवर नेमका गोळीबार का झाला? याच कारण अस्पष्ट आहे. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांनी 3 गोळ्या चालवल्या आहेत.

Gun Shot | Photo Credit - Pixabay

नवी मुंबई (Navi Mumbai) च्या नेरूळ (Nerul) मध्ये आज दिवसाढवळया एका बिल्डरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 2 बाईकस्वारांनी कारमध्ये बसलेल्या बिल्डरवर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गोळीबार करण्यासाठी 2 जण बाईकवर आले आणि या हत्येनंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान बिल्डरचं नाव सावजी भाय पटेल आहे.

बिल्डरवर नेमका गोळीबार का झाला? याच कारण अस्पष्ट आहे. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांनी 3 गोळ्या चालवल्या आहेत. नेरूळ मध्ये सेक्टर 6 येथील अपना बाजार समोर त्यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शी त्यांच्यावरील गोळीबार हा जमिनीशी निगडीत व्यवहारांवरून झाला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या पोलिस अधिक तपास करून मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत. नक्की वाचा: Ambernath Firing Video: अंबरनाथमध्ये अंदाधुद गोळीबार, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल .

सावजी भाय पटेल 65 वर्षीय बिल्डर होते. इंपिरिया ग्रुप मध्ये भागीदार होते. त्यांच्यासोबत अन्य 6 भागीदार देखील आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement