Navi Mumbai Shocker: दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्याचं मित्रांकडूनच अपहरण; सिगारेटचे चटके देत मागितली 50 हजारांची खंडणी

पीडीत मुलाला मित्रांनी त्रास दिला सोबतच जळत्या सिगारेटचे चटके दिले. सुटका करण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली.

Kidnapping | (File Image)

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये 16 वर्षीय मुलाचं अपहरण (Kidnapping) झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खंडणी वसूल करण्यासाठी मित्रांकडूनच अपहरण करून त्याला छळल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडीत मुलगा हा नवी मुंबई मधील वाशीचा (Vashi) रहिवासी होता. त्याचं 7 मित्रांकडून अपहरण करण्यात आलं नंतर पैसे उकळण्यासाठी त्याला त्रासही देण्यात आला. पीडीत मुलगा सध्या दहावीच्या परीक्षेचा विद्यार्थी आहे.

Times of India,च्या रिपोर्टनुसार मित्रांच्या ग्रुपने 16 वर्षीय तरूणाचे अपहरण केले आणि त्याला वाशी गावाजवळील एका जेट्टी वर नेले. पोलिसांच्या माहितीनुसार या पीडीत मुलाला मित्रांनी त्रास दिला सोबतच जळत्या सिगारेटचे चटके दिले. सुटका करण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केली. 1 मार्चला या पीडीत मुलाने आपण दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांसोबत अभ्यास करायला जातोय असं त्याने पालकांना सांगितलं. Maharashtra Board HSC परीक्षेचा एक्झाम सेंटर वरून गायब झालेला मुलगा अखेर घरी परतला; कबुल केलं गायब होण्यामागील खरं कारण .

वाशी पोलिस स्टेशनच्या ऑफिसर कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग जवळ उभं राहून मित्राशी बोलत असताना एक गाडी आली आणि त्याला अपहरण करून घेऊन गेली. पिडीत मुलाचे 7 मित्र देखील गाडीत होते. नंतर, त्याने घरी पोहोचल्यावर खंडणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या घराजवळ सोडले. मात्र, लगेच पैसे न दिल्याने त्याच्या मित्रांनी त्याला 70 हजार रुपये खंडणी देण्यास सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या पालकांनाही बोलावून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. मात्र, आरोपी 19 ते 21 वर्षे वयोगटातील असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नसून त्यांना नोटीस बजावली आहे.

दुसर्‍या एका घटनेमध्ये, नवी मुंबईतील एका बँकेजवळ संशयास्पद रीतीने फिरत असल्याबद्दल चौकशी केल्यानंतर पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी, ३ मार्च रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास कोपरखैरणे परिसरात घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement