गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाला, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वासाठी नवा चेहरा कोण?

एकेकाळी कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. गणेश नाईक यांच्यामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार होण्यास मोठी मदत झाली. खास करुन गणेश नाईक या एकखांबी तंबूवर राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई शहरावर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, गणेश नाईक हे आता भाजपच्या वाटेवर आहेत.

Ganesh Naik | (Photo: Facebook)

Maharashtra Assembly Eections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेत्यांचा भाजप प्रवेश आता जनतेसाठी नवा विषय राहिला नाही. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik हेसुद्धा आता भाजपमध्ये प्रवेशकर्ते होत आहेत. येत्या 9 सप्टेंबरला नाईक हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गणेश नाईक यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या नवी मुंबई (Navi Mumbai) येथेच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजते. दरम्यान, नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वासाठी कोणता नवा चेहरा देणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि जाणते नेते होते. तसेच, ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याही जवळचे नेते म्हणून नवी मुंबईत लोकप्रिय होते. गेले काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज होते. त्यांचे पुक्ष संदीप नाईक यानी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत नुकताच भाजप प्रवेश केला. दरम्यान, आता गणेश नाईक हेसुद्धा भाजप प्रवेश करत आहेत. दरम्यान, नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ नगरसेवक आणि ५ अपक्ष नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. गणेश नाईक यांच्यामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार होण्यास मोठी मदत झाली. खास करुन गणेश नाईक या एकखांबी तंबूवर राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई शहरावर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, गणेश नाईक हे आता भाजपच्या वाटेवर आहेत. (हेही वाचा, BJP Maha Janadesh Yatra: भाजप हाऊसफुल, आमची मेगाभरती नव्हे तर, लिमिटेड भरती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

दरम्यान, गणेश नाईक याचे पुत्र संदीप नाईक यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवी मुंबईतील चेहरा होते. नाईक पिता-पुत्रांच्या प्रवेशाने नवी मुंबई शहरात भाजपचीत ताकद वाढणार आहे. तर, आपले प्रभावक्षेत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबई परिसरात नेतृत्वासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now