Navi Mumbai Cyber Fraud: आभासी मैत्रीच्या जाळ्यात महिलेला 54 लाख रुपयांचा गंडा; अनोळखी व्यक्तीशी Virtual Friendships, व्हॉट्सऍपवर चॅट महागात

सदर महिलेने तिच्यासोबत सायबर फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Virtual Friendship Fraud: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी आभसी मैत्री (Virtual Friendship) करणे आणि त्याच्याशी त्याच माध्यमातून संवाद साधणे नवी मुंबई येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या या 38 वर्षीय महिलेला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 54 लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. सदर महिलेने तिच्यासोबत सायबर फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपाससुरु आहे. आरोपींनी तिला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आणि व्हॉट्सअॅप चँटींगच्या मदतीने जाळ्यात ओढले. आरोपी आणि पीडिता यांच्यात आभासी मैत्री संवाद होता.

नवी मुंबई येथील ऐरोली भागात राहणारी सदर महिला आयटी कंपनीत चांगल्या वेतनावर काम करते. ऑगस्ट 2023 मध्ये लुकास इथन नावाच्या एका व्यक्तीने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. जी तिने स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद आणि आभासी मैत्री सुरु झाली. लुकास इथन नामक व्यक्तीने आपण युकेमध्ये राहात असून तिथल्या एका बँकेमध्ये मॅनेजर असल्याचे तिला सांगितले. महिलेलाही विदेशात नोकरी करण्याची लालसा होती. जी तिने त्याला संवादाच्या ओघात बोलून दाखवली. दोघांमधील फेसबुक मेसेंजरवरील संवाद व्हॉट्सअॅपवर आला आणि तो अलिकडील काही दिवसांमध्ये नित्याचा झाला.

दरम्यान, लुकास याने 1 सप्टेंबर 2023 रोजी पीडित महिलेला एक मेसेज पाठवला. ज्यामध्ये आपण इंडोनेशिया येथे आलो आहोत आणि आपले फॉरेन्स करन्सीचे कार्ड बंद झाले आहे. ते पुन्हा एक आठवड्याने सुरु होणार असल्याने आपल्याला नियमीत खर्च भागविण्यासाठी काही पैशाची गरज असल्याचे म्हटले होते. मदत म्हणून त्याने या महिलेला पाच हजार युएसडॉलर्स पाठविण्याची विनंती केली. महिलेने कोणताही विचार न करता त्याला चक्क साडेपाच लाख रुपये पाठवून दिले. दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये लुकास याने सदर महिलेला तब्बल 32 लाख 45 हजार रुपये पाठवल्याची पावती व्हॉट्सअॅप केली. आपण अडचणीत असताना तू आपल्याला केलेली मदत मी विसरु शकत नाही. त्यामुळे आपण अधिकची रक्कम पाठवतो आहोत, असे त्याने तिला पावतीसोबत दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितले.

लुकास याची पावती मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिल्ली येथील रॉयल बँक ऑफ स्कॉलँड बँकेतून आपण बोलत असल्याचे भासवत एका महिलेने पीडित महिलेशी संपर्क साधला. तसेच, आपल्या खात्यावर विदेशातून 32,4500 रुपये आले आहेत. त्यावर तुम्हाला 3,75,000 रुपये करापोटी भरावे लागतील असे सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर विदेशातून पाठविण्यात आलेली रक्कम तिच्या खात्यावर वळती केली जाईल, असेसांगितले. दरम्यान, या महिलेने विश्वास ठेवत पैसे भरले. धक्कादायक म्हणजे जशी मागणी होईल तसे वेगवेगळ्या कारणांनी महिलेकडून पैसे उकळण्यात आले. ही सर्व रक्कम गुगल पे आणि एनइएफटी द्वारे बँकांच्या विविध खात्यावर भरण्यात आली.

सर्व रक्कम मिळून आकडा जेव्हा 44 लाख 55 हजार रुपयांचा झाला तेव्हा महिलेला संशय आला. तिने मुंबई फोर्ट येथील रॉयल बँक स्कॉटलँड येथील शाखेत जाऊन चौकशी केली. तसेच, 32, 45,000 हजार रुपयांची फॉरेन रेमिटन्सची पावती दाखवली असता सदर बँक व्यवस्थापनाने ही पावती बनावट असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तसेच, तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif