Navi Mumbai Crime News: नेरळमध्ये भिकाऱ्याचा विद्यार्थ्यींवर जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक
त्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बिअरच्या बाटलीने मारल्याच्या आरोप महिलांने केला आहे.
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील नेरुळ येथे एका भिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बिअरच्या बाटलीने मारल्याच्या आरोप महिलांने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेत पीडित महिला जखमी झाली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. इमाम हसन शमशुद्दीन असं आरोपीचे नाव आहे. आरोपी 26 वर्षाचा आहे. पीडितेचे वय 21 वर्षे असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली येथील राहणारी ही महिला एका मैत्रिणीसह नेरूळ येथील महाविद्यालयात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती परिसरातील एका बसस्थानकावर उभी असताना भिकारी घटनास्थळी आला आणि बिनाकारण महिलेवर आरोपीने बिअरची रिकामी बाटलीने हल्ला केला, अशी माहिती नेरळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक तानाजी भगत यांनी दिली. आरोपीने महिलेच्या डोक्यावर बाटलीने वार केला आणि त्यानंतर बाटलीच्या काचेच्या तुकड्याने तिच्या पोटात वार केला या घटनेत ती गंभीर जखमी झाली. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हेही वाचा-अंधेरीमध्ये वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षाच्या मुलीची केली सुटका
पीडिताच्या बाजूला असलेल्या स्थानिकांनी पीडितेची मदत केली. पीडितेला जवळच्या रुग्णालयत दाखल केले.सद्या तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याने हल्ला का केला हे अद्याप अस्पष्ट आहे.