Navi Mumbai News: कुजलेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, पनवेल पोलिस ठाण्यात अज्ञांतावर गुन्हा दाखल
भिंगरी गावाजवळील सर्व्हिस रोडलगतच्या झुडपात एका 19 वर्षीय महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला.
Navi Mumbai News: पनवेल (Panvel) तालुक्यातील भिंगरी गावाजवळील सर्व्हिस रोडलगतच्या झुडपात एका 19 वर्षीय महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेअंतर्गत पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या आणि तिचा चेहरा सुजला होता. जयश्री बाब्या पवार असे मृत महिलेचे नाव असून ती रायगड जिल्ह्यातील पेण येथील जोगेश्वरी कडेसपाडा गावातील रहिवासी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांना मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “चेहरा सुजला होता आणि तिच्या तोंडाजवळ जखम होते. पनवेल तालुक्यातील भिंगरी गावाजवळील पळस्पे ते शिवशंभो दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर मृतदेह टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यांनी आवाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली.
प्राथमिक तपासात तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह सापडण्याच्या सुमारे दोन दिवस आधी ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पनवेल तालुका पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2023 07:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

