नवी मुंबईतील APMC मार्केट 18 मे पासून पुन्हा सुरु होणार
तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान नवी मुंबई येथील सर्वात मोठे मार्केट एपीएमसी येथील परिसरात सुद्धा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्या ते बंद ठेवण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. तर मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान नवी मुंबई (Navi Mumbai) येथील सर्वात मोठे मार्केट एपीएमसी (APMC) येथील परिसरात सुद्धा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्या ते बंद ठेवण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता उद्यापासून (18मे) एपीएमसी मार्केट मधील भाजी, मसाले आणि अन्न धान्याची बाजारपेठ सुरु होणार आहे. परंतु कांदे-बटाटे आणि फळांचे मार्केट गुरुवार पासून चालू करण्यात येणार आहे. एपीएमसी येथे कोरोनाची लागण व्यापारी आणि कामगारांना बसल्यानंतर त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती.
एपीएमसी मार्केट मध्ये 315 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने एपीएमसी मार्केट बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून एपीएमसी मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. पण शनिवारी झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, कोरोनाचे महासंकट हा वास्तविक धोका आहे. परंतु मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने त्याचा हजारो लोकांवर परिणाम होत आहे.(Coronavirus In Maharashtra: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)
एपीएमसी मार्केटमध्ये आता कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वोतोपरी काळजी घेण्यात येणार आहे. मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासोबत स्वच्छता सुद्धा राखण्यात येणार आहे. बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यास येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासोबत मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. तसेच बाजारपेठांमध्ये कामाच्या वेळा ठरवून दिल्या जाणार आहेत. गेल्या महिन्यात नवी मुंबई महापालिकेने सुद्धा कर्मचारी, व्यापारी, कामगारांसाठी स्क्रिनिंग कॅम्पचे एपीएमसी येथे आयोजन केले होते.