Navi Mumbai Airport मे महिन्याच्या अखेरीस होणार सुरू; 2030 पर्यंत घेणार मुंबईतील T1 ची जागा

2025 च्या हिवाळ्यात, मुंबई विमानतळाद्वारे सध्या हाताळल्या जाणाऱ्या 55 ​​दशलक्ष प्रवाशांपैकी फक्त 1/5 प्रवासी नवी मुंबई विमानतळाकडे जातील. सांताक्रूझ (पूर्व) येथे मुंबईच्या टर्मिनल 1 द्वारे हाताळलेल्या 15 दशलक्ष प्रवाशांपैकी 10 दशलक्ष प्रवाशांना घेऊन जाणारी उड्डाणे ऑक्टोबरच्या अखेरीस NMIA च्या T1 वर स्थलांतरित होण्याची शक्यता आहे,

Flights प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit - X/ANI)

नवी मुंबई विमानतळ (Navi  Mumbai Airport)  2025 मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. त्यामुळे टप्य्याटप्प्याने सध्याच्या सांताक्रुझ भागात असलेल्या टी 1 विमानतळाची जागा नवी मुंबई विमानतळ घेणार असल्याचं चित्र असेल असा अहवाल देण्यात आला आहे. प्रवाशांची निवड 2030 पर्यंत नवी मुंबई विमानतळाला असेल असे सांगण्यात आले आहे.

TOI च्या वृत्तानुसार, तर उर्वरित 5 दशलक्ष मुंबईच्या टर्मिनल 2 वर सामावून घेतले जातील. हा मुंबई टी 2 मधील बदल करण्यासाठी तेथील क्षमता 40 मिलियन वरून 45 मिलियन केली जाणार आहे असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: First Commercial Flight Lands At Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वी, पहा व्हिडिओ .

सध्या, सर्व उड्डाणे-देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय-मुंबई विमानतळावरील एकाच ऑपरेशनल धावपट्टीवर उतरतात, त्यानंतर प्रवाशांना त्यांच्या संबंधित टर्मिनल T2 किंवा T1 वर नेले जाते. खाजगी आणि चार्टर विमानांसह बहुतेक सामान्य विमान उड्डाणांचे देखील येत्या काही महिन्यांत नवी मुंबई विमानतळावर ट्रान्सफर होणार आहे. या हिवाळ्यात, मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक कोंडी कमी होऊन punctuality record सुधारेल अशी अपेक्षा आहे. परिणामी, मुंबई विमानतळावर उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या फ्लाइट्सचा होल्डिंग टाइम किंवा डिपार्चरसाठी पुशबॅक सुरू होण्याची प्रतीक्षा वेळ कमी होण्याची शक्यता आहे, वेळेवर कामगिरी सुधारेल. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now