Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव ट्रकची चार जणांना जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नवी मुंबईतील उरणमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेलच्या समोरील सर्विस रोडवर ही भीषण दुर्घटना घडली आहे. सर्विस रोडवरुन जाणाऱ्या 4 इसमांना एका भरधाव ट्रकने उडवल्याची थरारक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून उरण पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान या अपघातानंतर पोलीस आता ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहे. (हेही वाचा - Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल वर 27 ऑगस्टला मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक; जाणून घ्या वेळा)
काल रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात घडला असून उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेलच्या समोरील सर्विस रोडवर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य हे सुरु केले. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या अपघताचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून पुढील तपास हा सुरु आहे. या मार्गावर यापुर्वीही वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना या घडल्या आहेत.