नवी मुंबईत शाळा सुरु होताच 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
परंतु सध्या मुलांना ही कोरोनाची लागण होत आहे. अशातत नवी मुंबईतील शाळेत मास्क टेस्टिंग दरम्यान, 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यभरात शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु सध्या मुलांना ही कोरोनाची लागण होत आहे. अशातत नवी मुंबईतील शाळेत मास्क टेस्टिंग दरम्यान, 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी 8 वी ते 11 वी पर्यंत शिकतात. 18 डिसेंबरला शाळेत झालेल्या मास्क टेस्टिंगवेळी 600 विद्यार्थ्यांची चाचणी केली गेली.(BMC COVID-19 Guidelines On New Year Celebration: ख्रिसमस, नववर्ष सेलिब्रेशन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून निर्बंध; घ्या जाणून)
ऐवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी संक्रमित झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईच्या महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे वडिल कतर येथून भारतात आले होते. खबरदारी म्हणून परदेशातून परतलेल्या या व्यक्तीसह त्याच्या संपूर्ण परिवाराची कोविड19 ची चाचणी केली गेली. यावेळी व्यक्तीची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु मुलाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पॉझिटिव्ह विद्यार्थी अन्य विद्यार्थ्याच्या संपर्कात आले. त्यावेळी कोरोनाची चाचणी केल्यानंतर 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.(Mumbai: लसीचे 3 डोस घेतल्यानंतर सुद्धा अमेरिकेतून परतलेला व्यक्ती कोरोना संक्रमित)
दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे आणि नवी मुंबईत 15 डिसेंबर पासून शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी निर्जंतुकीकरण आणि अन्य महत्वाच्या गोष्टींची तयारी करण्यात आली होती. प्रशासनाकडून आता शाळेत सामूहिक पद्धतीने कोरोनाची चाचणीसाठी कॅम्प आयोजित करणार आहे.