लाळ गळणं थांबवण्यासाठी तोंडातून फिरवलेला मासा घशात अडकला अन 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत अनर्थ घडला, बारामतीचे डॉक्टर ठरले देवदूत
पाच महिन्यांची मुलगी लाळ (Drooling) गाळते म्हणून तिच्या मावशीने तोंडातून जीवंत मासा फिरवण्याचा प्रकार त्या चिमुकलीसाठी काही काळ जगण्यामरणाचा प्रश्न बनला होता.
पाच महिन्यांची मुलगी लाळ (Drooling) गाळते म्हणून तिच्या मावशीने तोंडातून जीवंत मासा फिरवण्याचा प्रकार त्या चिमुकलीसाठी काही काळ जगण्यामरणाचा प्रश्न बनला होता. कारण मासा फिरवून लाळ गळण्याचं प्रमाण कमी होतं या अंधश्रद्धेपायी घरच्या घरी उपाय करताना मावशीच्या हातातून मासा निसटला आणि तो थेट चिमुकलीच्या घशात अन्ननलिकेमध्ये जाऊन अडकला. या प्रकारानंतर चिमुकलीचा श्वास बंद झाला.
पाच महिन्याच्या मुलीच्या घशात मासा अडकल्यानंतर पुढील काही वेळातच श्वास बंद होऊन ती अस्वस्थ झाली. हा प्रकर लक्षात येताच तिच्या पालकांनी स्थानिक रूग्णालय गाठलं. बारामतीच्या रूग्णालयात चिमुकलीवर उपचार करण्यात आले. सुरूवातीला सीपीआर देऊन बंद पडलेलं हृद्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर दुर्बिणीच्या सहाय्याने एका शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढून चिमुकलीला बचावण्यात यश आलं.
बापू माळी असे या चिमुकलीच्या वडीलांचं नावं आहे. भीमा पाटसमध्ये ते ऊसतोडीच्या कामासाठी आले होते. चाळीसगाव हे त्यांचं मूळ गाव अहे. शिर्सूफळ या गावामध्ये असताना हा प्रकार घडला.