राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते हिचा शिवसेना नेत्यांकडून अपमान; 'भारतात राहायचं तर आधी मराठी शिकून घे' सांगत बोलण्यापासून अडविले
"भारतात राहायचे असेल तर मराठी शिकून घे" असे सांगत काहींनी झेनच्या हातून माईक काढून घेतला असे तिने सांगितले आहे.
मुंबई मधील झेन सदावर्ते (Zen Sadavarte) या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (National Bravery Award) विजेत्या 12 वर्षीय मुलीचा शिवसेना (Shivsena) नेत्यांकडून एका भर कार्यक्रमात अपमान करण्यात आल्याचे समजतेय. जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) निमित्त आयोजित कांरण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेकडूनच झेन हिला सुद्धा आमंत्रण होते, मात्र स्टेजवर बोलत असताना मराठीचा वापर न केल्याने आयोजकांसह शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तिला अपमानास्पद वागणूक दिल्याचे झेन हिने सांगितले आहे. "भारतात राहायचे असेल तर मराठी शिकून घे" असे सांगत काहींनी झेनच्या हातून माईक काढून घेतला असाही खुलासा तिने माध्यमांशी बोलताना केला. पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये मराठी विषय अनिवार्य; उल्लंघन केल्यास होणार एक लाखाचा दंड!
झेन हिने ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत या घटनेचा खुलासा केला, कार्यक्रमात बोलत असताना मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहाराच्या बाबत,तृतीयपंथाच्या हक्कांबाबत आपण बोलत होतो, मात्र अशा वेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही अगोदरच सर्व प्रकारचे आरक्षण दिले आहे असे खोटे सांगत तिला अडवायचा प्रयत्न केला, त्यानंतर मराठी येत नाही म्ह्णून तिला बोलण्यापाऊसन थांबवत हातातून माईक काढून घेतला असे झेन हिने सांगितले आहे. वास्तविक भारतीय संविधानातून कलम 19 नुसार अशा प्रकारे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाहीत तसेच केंद्रीय कामकाजाची भाषा सुद्धा इंग्रजी व हिंदी असल्याने मला देशात राहण्यासाठी कोणतीही भाषा शिकण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही असेही झेन हिने माध्यमांसमोर म्हंटले आहे.
ANI ट्विट
झेन सदावर्ते ही यंदाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती आहे, मुंबई मधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत तब्बल 17 जणांचे प्राण वाचवण्यासाठी तिला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, मुंबई उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांची ती कन्या आहे. तिची कर्तबगारी पाहून तिला अनेक ठिकाणी कार्यक्रमात बोलावले जाते पण शिवसेनेने केवळ भाषेच्या आग्रहावरून तिला वाळीत टाकल्यासारखी किंबहुना तिच्यावर अन्याय केल्याची भावना झेन हिने व्यक्त केली आहे.