Nashik Accident: परिक्षेसाठी जात असताना अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचा रस्तारोको आंदोलन
मात्र, पुढे जाऊन जे घडलं ते धक्कादायक.
Nashik Accident: शाळेत जाण्यासाठी घरातून नात आजोबांसोबत निघाली होती. मात्र, पुढे जाऊन जे घडलं ते धक्कादायक. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दिवसेंदिवस अपघाताचे चित्र वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. (हेही वाचा- निलगायीच्या धडकेत भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू,
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या रस्त्यावरून जात असताना दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवर दोन शाळकरी विद्यार्थ्यींनी आणि आजोबा जात होते. एसटीबसच्या चाकाखाली दुचाकी आली आणि भयंकर अपघात झाला. एसटीच्या चाकाखाली एक विद्यार्थिंनी आणि आजोबा चिरडून गेले. त्या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोघान्ही जागीच प्राण सोडले. या अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मुंगसे गावात घडली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
सिताराम सूर्यवंशी असं अपघातात मृत झालेल्या आजोबांचे नाव आहे. दोन नातींच्या शाळेच्या परिक्षेसाठी जाण्यासाठी दुचाकीवरून जात होते. यावेळी नाशिककडून मालेगावकडे जाणाऱ्या बसची धडक दुचाकीला लागली. यात आजोबा आणि आणि एका नातीचा मृत्यू झाला. तर दुसरी नातं गंभीर जखमी झाली आहे. तीच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती गावात कळताच, गावकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको केला आहे.या घटनेनंतर गावात शोक पसरला आहे. मुलींच्या शाळेत परिक्षा सुरु होत्या. नेहमी प्रमाणे आजोबा दुचाकीवरून शाळेत सुटतील या आशेने प्रवास सुरु केला परंतु काळाने घाला घातला आणि दोघांचा अपघातात मृत्यू झाला.