Nashik Crime News: भरदिवसा नाशिक येथे भाजीविक्रेत्याचा खून, तीन तासात आरोपी पोलीसांच्या ताब्यात; एक आरोपी फरार

नाशिक येथे भरदिवसा भाजी विक्रेत्या खून केल्या प्रकरणी पोलीसांनी पाच आरोपीला अटक करण्यात आले आहे. एक आरोपी फरार झाला आहे.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nashik Crime News:  नाशिक (Nashik) शहारात गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.नाशिक येथील अंबड परिसरात भरदिवसा भाजीविक्रेत्याचा खून (Murder) करण्यात आला आहे. या घटनेमुळे अंबंड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे काही अंतरावरच पोलिस ठाणे असल्याची  माहिकी वृत्तांनी दिली आहे. भरदिवसा परिसरात लोकांची वर्दळ असताना देखील एका भाजी विक्रेत्याला मारून टाकण्यात आले आहे. नाशिक मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून चार खूनांची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील अंबंड परिसरात गुरुवारी भरदिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. हा परिसर नागरिकांच्या वर्दळीने भरलेला असतो. या घनटेनंतर नागरिकांनी त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभारला आहे. अंबड परिसरातील सिडको येथील शॉपिंग सेंटर जवळ टोळक्यांनी येवून भाजीविक्रेत्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केला. चार ते पाच वेळा वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर पडला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला पीडित तरुण, काही क्षणातच त्याने प्राण सोडले. संदीप आठवले असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेचा व्हिडिओ जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांना संदीपचा मृतदेह ताब्यात घेवून   रुग्णालयात पाठवला. पोलिसांना या घटनेतील आरोपीचा शोध सुरु केला. त्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील काही भागात कडक बंदोबस्त लावला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली. या घटनेची माहिती मृत मुलाच्या घरच्यांना कळताच त्यांनी आक्रोश फोडला. जो पर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत नाही तो पर्यंत मृतदेह आम्ही घेणार नाही असा आक्रोश करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांनी देखील काही तासांत आरोपींना ताब्यात घेतले. संशयितांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना अटक करतात तरुणाचा मृतदेह कुटूंबाकडे देण्यात आला. चौकशी दरम्यान एक आरोपी फरार असल्याचे समजले. त्याला ही लवकरच पकडण्यात येईल असा दावा पोलीसांनी केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement